परिचय

📘 माझा राजकीय व सामाजिक प्रवास

एक समृद्ध व प्रेरणादायी कार्ययात्रा

राजकीय प्रवासाची सुरुवात (2001–2009)

कोणताही राजकीय वारसा नसतानाही स्वतःच्या कर्तृत्वावर राजकीय वाटचाल सुरू झाली. २००९ साली प्रथमच भा.ज.यु.मो. शहर सरचिटणीस म्हणून निवड झाली.

२००१ ते २००६ या महाविद्यालयीन काळात तळागाळातील गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीची मजबूत पायाभरणी केली. तसेच विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती मिळावी यासाठी कॉलेज व्यवस्थापनाशी संघर्ष करून विद्यार्थ्यांना बँक खात्यावर शिष्यवृत्ती मिळवून दिली.

समाजकार्य आणि जनसेवा (2006–2011)

२००६ ला गोदापरीक्रमादरम्यान पुरग्रस्तांना विविध स्वरूपात मदत केली. दिवंगत नेते गोपीनाथजी मुंडे साहेबांसोबत ग्रामीण भागात प्रवास करून जनतेच्या प्रश्नांची जवळून ओळख झाली.

न थकता, न थांबता जनसेवा करण्याची जिद्द मनात दृढ झाली.

सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम (2011)

२०११ मध्ये पैठण तालुका शिवजयंतीचे अध्यक्ष म्हणून:

  • घोडे व बैलगाड्या मिरवणुका
  • वारकरी दिंडी
  • सोलापूरमधील युद्धकला कलाकारांचे सादरीकरण
अशा अनेक उपक्रमांतून शिवकालीन परंपरा स्मरणात ठेवण्याचे मोठे प्रयत्न केले.

तसेच रास्ता रोको करून स्थानिक प्रश्न सोडविणे व नागरिकांना गॅस सुविधा नियमित मिळवून देणे यासारखी कामे केली.

नेतृत्वाची अधिकृत सुरूवात (2011–आजपर्यंत)

२०११ पासून आजपर्यंत भा.ज.यु.मो. पैठण तालुका अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड. यामुळे राजकीय प्रवासाला नवी दिशा मिळाली.

२०१२ ला शिवराज्याभिषेक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. २०१३ ला पैठणमधील विद्यार्थ्यांसाठी शिवनेरी सहल.

सचिन तेंडुलकर प्रेरणेमुळे दर्जेदार क्रिकेट सुविधा सुरू केल्या. तसेच २०१२ ला राज्यस्तरीय कमळ चषक लेदर बॉल स्पर्धेचे आयोजन केले.

जनहितासाठी लढा (2013–2014)

२०१३ मध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी लाक्षणिक उपोषण करून मदत योग्य प्रकारे मिळवून दिली.

सिल्लोड नगरपालिका प्रचार, पैठण तालुक्यात व गंगाथडी भागात लोकसभा निवडणुकीत सक्रिय प्रचार करून पक्षाला मोठा मताधिक्य मिळवून दिला.

जनसेवा आणि समस्या निराकरण (सतत सुरू)

ग्रामस्थांच्या अडचणी ओळखून पंचायत समिती, तहसील, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शैक्षणिक संस्था, पोलीस स्टेशन इत्यादी माध्यमातून शेकडो समस्या सोडविल्या.

गोरगरिबांना न्याय मिळवून देणे, विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे आणि समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करणे हे ध्येय कायम ठेवले आहे.

✦ प्रेरणादायी कविता ✦

येईल संधी जेव्हा चालूनी स्विकारल्या विना राहू नको असेल करण्या जे चांगले साकारण्याविना सरू नको जाती जमाती धर्म पाहूनी कमीची गती फिरवू नको सत्कार्मावर ठेवून निष्ठा धर्म मानवी विसरू नका. ध्यास विकासाचा श्वासतच झाला जगण्याचा आज गरज आहे समाजाभिमुख नेतृत्वाची प्रगल्भ विचारांची निष्कलंक आचाराची अभ्यासू वृत्तीची त्यासाठीच..............! अभ्यासपूर्ण वक्तृत्व.............. प्रभावी नेतृत्व ................. सचिन खेडकर